महाराष्ट्र बोर्डाला उशिरा जाग,इयत्ता १० वीच्या परीक्षा रद्दचा निर्णय.

65

मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. 

ICSE आणि CBSE बोर्डाने इयत्ता १० वीच्या परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केल्या होत्या मात्र महाराष्ट्र बोर्डाने पुढे ढकलल्या असा निर्णय काही दिवसांपूर्वीच जाहिर केला होता.

कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता राज्य सरकारने दहावीच्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र बारावीच्या परीक्षा होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तर त्यासोबतच बारावीच्या परीक्षा होणार असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे बारावीच्या परीक्षा कधी होणार याबाबत शालेय शिक्षण खाते काय निर्णय घेते याकडे लक्ष लागलं आहे.