News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

टोकियो: भारताचा खेळाडू नीरज चोप्रा याच्या खेळीकडं भारतातील जनतेच्या नजरा लागल्या होत्या. पहिल्या राऊंडमध्ये 87.03 मीटर लांब भाला फेक करत तो आघाडीवर होता. नीरज चोप्रा भारताला यंदाच्या ऑलंम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून देतो का याकडं सर्वांच लक्ष लागलंय. दुसऱ्या राऊंडमध्ये नीरज चोप्रानं 87.58 मीटर एवढ्याअंतरावर थ्रो फेकला आहे.

पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये नीरज चोप्रा आघाडीवर होता . टोकिओ ऑलिम्पिकमधील आणि भालाफेकीत मिळणारं हे भारतातील पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे. नीरज चोप्रा हा हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावातील आहे.

2018 मध्ये नीरज चोप्रानं आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं. त्यावेळी त्यानं 88.06 मीटर भाला फेकला होता.