News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

मुंबई दि. २८ : दिवाणी न्यायालयीन अधिनियमानुसार नाशिक जिल्ह्यातील येवला आणि सिन्नर येथे दिवाणी न्यायालय सुरू करण्याबाबतची अधिसूचना विधि व न्याय विभागाने जारी केली आहे.

येवला आणि सिन्नर येथील दिवाणी न्यायालयात अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश हे या न्यायालयाचे पीठासीन अधिकारी असतील. येवला आणि सिन्नर या न्यायालयाच्या सर्वसाधारण अधिकारितेच्या सीमा या संबंधित महसुली तालुक्यामध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्रांशी समव्यापी व समाविष्ट असतील असे या अधिसूचनेत नमुद केले आहे