नाशिक ओझर विमानतळावर 3 कोरोना पॉझिटिव्ह

95

राज्य शासनाच्या गाईडलाईन्स नूसार ओझर विमानतळावर परराज्यातून येणार्‍या प्रवाशांना करोना चाचणी रिपोर्ट बाळगणे बंधनकारक आहे. मात्र, हा रिपोर्ट नसलेल्या १११ प्रवाशांपैकी ३ प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.

गेल्या पाच दिवसात ओझर विमानतळावर ४८४ प्रवासी उतरले. त्यापैकी ३७३ प्रवाशांकडे करोना चाचणी केल्याचे सर्टिफिकेट होते. तर, १११ प्रवाशांकडे सर्टिफिकेट नसल्याने त्यांची विमानतळावरच करोना चाचणी करण्यात आली. पॉझिटिव्ह आढळलेले तिन्ही प्रवाशी मूळचे नाशिकचे असून, त्यातील दोघे अहमदाबाद, तर एक दिल्लीहून नाशिकला परतला होता. या तिघांना महापालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

संदर्भ व अधिक माहिती – dailyhunt