तुमच्या बातम्या, लेख, विचार, सूचना इमेलवर पाठवा. Email – thalaknews@gmail.com
Home Corona COVID-19 मास्क वापरा नाहीतर कोरोना सेंटर मध्ये सेवा करा

मास्क वापरा नाहीतर कोरोना सेंटर मध्ये सेवा करा

110
तुमच्या बातम्या, लेख, विचार, सूचना इमेलवर पाठवा. Email – thalaknews@gmail.com
तुमच्या बातम्या, लेख, विचार, सूचना इमेलवर पाठवा. Email – thalaknews@gmail.com

गुजरातमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ होत असल्याने काही निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. त्यात मास्क वापरणं बंधनकारक असलं तरी काही जण बेफिकीरीने वागत असल्याचं दिसून येतं आहे. काही जण मास्क न लावल्याचा दंड भरुनही मास्क वापरत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे गुजरातच्या हायकोर्टाने आता नामी शक्कल शोधून काढली आहे. 

मास्क न वापरणाऱ्यांवर केवळ दंड आकारणं पुरेसं नाही. त्यांना आता कोरोना सेंटरमध्ये दिवसाचे ५ ते ६ तास सेवा करण्याची शिक्षा द्यायला हवी आणि या शिक्षेचा कालावधी ५ दिवसांपासून ते १५ दिवसांपर्यंत असायला हवा, असे आदेश गुजरातच्या हायकोर्टाने दिला आहे. मास्क न वापरणाऱ्यांना कोरोना सेंटरमध्ये किती दिवस सेवा देण्याची शिक्षा द्यायची हे त्या व्यक्तीचं वय आणि आरोग्याच्या माहितीवरुन निश्चित केलं जावं, असंही हायकोर्टाने सुचवलं आहे. 

गुजरातमध्ये कोरोनाच्या दुसरी लाट असूनही काही लोक मास्क वापरत नसल्याचं समोर आलं आहे. अशा लोकांना कोरोना सेंटरमध्ये सेवा देण्याचा निकाल हायकोर्टाने दिला आणि राज्य शासनालाही त्यासंदर्भातील आदेश जारी करण्यास सांगितलं आहे. मुख्य न्यायाधीश विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. 

संदर्भ व अधिक माहिती – लोकमत

तुमच्या बातम्या, लेख, विचार, सूचना इमेलवर पाठवा. Email – thalaknews@gmail.com