हिंदूंच्या देवतांचा सातत्याने अवमान करणार्‍या अ‍ॅमेझॉनवर बहिष्कार टाकण्याचे ट्विटरवरून आवाहन

66

साहित्यांची ऑनलाईन विक्री करणार्‍या अ‍ॅमेझॉनवरून हिंदूंच्या देवतांची चित्रे असणारी अंतर्वस्त्रे, पायपुसण्या, कमोड आदींच्या विरोधात आता हिंदूंनी पुन्हा अभियान राबवले आहे. या उत्पादनांची छायाचित्रे पोस्ट करत परदेशातील, तसेच भारतातील अनेक हिंदूंनी ‘अ‍ॅमेझॉनने ही उत्पादने विकणे तातडीने बंद करावीत’, अशी मागणी केली आहे. अनेकांनी अ‍ॅमेझॉनचे अ‍ॅप ‘अनइन्स्टॉल’ करण्याची मागणीही केल्याचे चित्र दिसत आहे.

ट्विटरवर #BoycottAmazon हा हॅशटॅग ट्रेंड करत अ‍ॅमेझॉनवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अ‍ॅमेझॉनवर हिंदु संस्कृतीचा अवमान करणार्‍या गोष्टींची विक्री केली जात असल्याचा आरोप या ट्रेंडच्या माध्यमातून अनेकांनी केला आहे. हा हॅशटॅग वापरून ट्वीट करणार्‍यांमध्ये परदेशात असणार्‍या भारतियांचाही समावेश आहे. भारतामध्ये अशी उत्पादने विकली जात नसली, तरी जगातील इतर देशांमध्ये अशी उत्पादने विकून हिंदु संस्कृतीचा अवमान केला जात आहे, अशा ट्वीट्सही अनेकांनी केल्या आहेत.

Source – dainik sanatan prabhat