पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषक वडीचे वितरण होणार !

38

पुणे – राज्यातील शासकीय शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी हे मुख्य घटक असलेल्या वड्या पोषण आहार अंतर्गत दिल्या जाणार आहेत. शालेय पोषण आहार कक्षाच्या वतीने शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी जिल्हा परिषदांच्या शिक्षणाधिकार्‍यांना वड्या वितरणाच्या सूचना परिपत्रक काढून दिल्या आहेत. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातील ५ दिवस ३० ग्रॅमच्या ४ वड्या, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ४५ ग्रॅमच्या ६ वड्या दिल्या जाणार आहेत. त्यामुळे वर्गातील पटसंख्येनुसार पोषक वड्यांची मागणी नोंदवावी लागेल.

संदर्भ – दैनिक सनातन प्रभात