कोरोनावरील देशी लस कोव्हॅक्सिन येत्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे. ब्रिटनच्या ऍस्टाझेनेका कंपनीच्याही आधी भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून बनविली जात असलेली कोव्हॅक्सिन लस बाजारात येण्याचा अंदाज आहे.
कोरोनावरील लस येण्यास थोडा उशीर लागणार असल्याचे अलीकडेच ऍस्टाझेनेकाकडून सांगण्यात आले होते. येत्या सप्टेंबर महिन्यापर्यत ब्रिटनला ३० दशलक्ष डोसेस देण्याचे आश्वासन ऍस्टाझेनेकाने दिले होते. पण डोसेस पुरवठ्याचा महिना लांबणीवर पडला आहे. कोरोना लसीवर सध्या विविध देशांमध्ये काम सुरू आहे.