पुणे – समग्र शिक्षा योजनेअंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पुरविण्यासाठी 13 कोटी 53 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली.
या योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाच्या हिस्स्याचे प्रमाण 60:40 असे आहे. केंद्र शासनाने 121 कोटी 87 लाख रुपयांचा निधी राज्याच्या एकत्रित निधीत जमा केला आहे. या निधीच्या प्रमाणात राज्य हिस्स्याचा निधी 81 कोटी 25 लाख रुपये इतका येतो.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालकांनी केंद्र व राज्य हिस्सा निधी वितरीत करण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. राज्य हिस्स्याच्या अर्थसंकल्पीय तरतूदीच्या 30 टक्के निधी वितरणास मान्यता दिली आहे.
शासनाकडून निधी वितरीत झाल्यानंतर कार्यक्रमनिहाय निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. कार्यक्रमनिहाय खर्चामध्ये बदल करण्यात येवू नयेत, असे आदेशही शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी जारी केले आहेत.
निधी आहरीत करुन वितरीत करण्यासाठी अवर सचिव तथा लेखा शाखेचे कक्ष अधिकारी यांना आहरण व संवितरण अधिकारी तर उपसचिवांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित केले आहे.
Source – Dailyhunt