बायडेन यांचा विजय भारतासाठी लाभदायक ठरू शकेल. बराक ओबामा यांच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या कारकिर्दीत भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांमध्ये उपराष्ट्रपती म्हणून त्या वेळी जो बायडेन यांनी चांगले काम केले होते. त्यांनी भारताचे समर्थन केलेे.
डोनाल्ड ट्रम्म आणि जो बायडेन यांच्यापैकी कुणाचा विजय झाल्यावर भारताला लाभ होईल, याविषयी तज्ञांनी मते मांडली आहेत.
१. बायडेन यांचा विजय भारतासाठी लाभदायक ठरू शकेल. बराक ओबामा यांच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या कारकिर्दीत भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांमध्ये उपराष्ट्रपती म्हणून त्या वेळी जो बायडेन यांनी चांगले काम केले होते. त्यांनी भारताचे समर्थन केलेे.
२. भारत-अमेरिका नागरी अणुकराराच्या संमतीसाठी आणि द्विपक्षीय व्यापारातील ५०० अब्ज अमेरिकन डॉलर्सचे उद्दिष्ट ठेवण्यात बायडेन यांचा मोलाचा वाटा होता.
३. बायडेन यांच्या ‘कोअर टीम’मध्ये भारतियांची संख्या मोठी आहे. बायडेन यांचे २ महत्त्वाचे सल्लागारही भारतीय वंशाचे आहेत.
४. बायडेन यांनी निवडणुकीच्या वेळी सांगितले की, ओबामा यांच्या कार्यकाळात आम्ही नेहमीच भारताशी भक्कम संबंधांना प्राधान्य दिले. जर मी राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलो, तर त्याला प्रथम प्राधान्य असेल.
५. ट्रम्प यांच्या पुन्हा येण्याने जागतिक पातळीवर चीनला उघडे पाडणे सुलभ होईल. या विषयावर दोन्ही देशांचे समान राष्ट्रीय हित आहे. सध्या भारत आणि अमेरिका या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जात आहेत.
६. त्याचबरोबर ट्रम्प सरकारच्या काळात संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रात केलेल्या करारास चालना मिळेल.
७. आरोग्य क्षेत्रातही सकारात्मक योजना अपेक्षित आहेत.
अमेरिकेतील भारतियांची राजकीय स्थिती
अमेरिकेत भारतीय वंशाचे ४० लाख लोक आहेत. त्यातील २० लाख मतदार आहेत. अमेरिकेतील एरिझोना, फ्लोरिडा, जॉर्जिया, मिशिगन आणि टेक्साससह ८ जागांवर भारतियांची मते बरीच प्रभावी आहेत. राजकीयदृष्ट्या भारतीय वंशाचे लोक येथे शक्तिशाली आहेत. अमेरिकेत एकूण ५ खासदार भारतीय वंशाचे आहेत.
अमेरिकेत एकूण १२ टक्के भारतीय वैज्ञानिक आहेत. ‘नासा’मधील वैज्ञानिकांपैकी ३६ टक्के वैज्ञानिक भारतीय आहेत. संपूर्ण देशातील डॉक्टरांपैकी ३८ टक्के डॉक्टर हे भारतीय आहेत. ‘मायक्रोसॉफ्ट’चे ३४ टक्के कर्मचारी भारतीय वंशाचे आहेत, तर ‘झेरॉक्स’ आस्थापनामध्ये भारतियांची संख्या १३ टक्के आहे. ‘आय.बी.एम्.’मध्ये २८ टक्के कर्मचारी हे भारतीय आहेत.
संपूर्ण बातमी – दैनिक सनातन प्रभात