अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक : बायडेन यांची विजयाकडे वाटचाल !

68

वॉशिंग्टन (अमेरिका) – America Election अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील मतमोजणी १२ नोव्हेंबरपर्यंत चालू रहाण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अद्याप याचा निकाल लागलेला नसला, तरी डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन २६४ इलेक्टोरल मतांनी पुढे असून ज्या राज्यात मतमोजणी चालू आहे, त्यातील नेवाडा आणि जॉर्जिया येथे त्यांना आघाडी मिळाली असल्याने त्यांना तेथे १६ मते मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे. बहुमतासाठी २७० इलेक्टोरल मतांची आवश्यकता आहे. या पार्श्‍वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी मतमोजणी थांबवण्याची मागणी केली आहे. मिशिगन आणि जॉर्जिया येथील न्यायालयात या प्रकरणी प्रविष्ट केलेल्या याचिका फेटाळण्यात आल्या आहेत, तर पेन्सिल्वेनिया राज्यामध्ये प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

Source – sanatanprabhat.org/marathi