पॅरिस – वाहतूक नियमाचे उल्लंघन करणार्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे फ्रान्समध्ये उसळलेला हिंसाचार अद्यापही चालूच आहे. या हिंसाचारात आतापर्यंत १३०० हून अधिक नागरिकांना अटक करण्यात आली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ नागरिक पॅरिस उपनगरात आणि फ्रान्समधील रस्त्यांवर उतरले आहेत. मार्सेल शहरात पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये संघर्ष झाला. अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. आंदोलकांकडून गाड्यांची जाळपोळ करण्यासह इमारती आणि दुकाने यांत लुटमार चालू आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर केला जात आहे.