Dengue Patients
Dengue Patients

पुणे – पावसाळ्‍यामुळे शहरात साथीच्‍या रोगांमध्‍ये वाढ होत आहे. त्‍यात डेंग्‍यूचे रुग्‍ण (dengue patients) अधिक प्रमाणात सापडत आहेत. जुलैमध्‍ये डेंग्‍यूचे ६६ संशयित रुग्‍ण आढळले असून त्‍यातील १२ जणांना डेंग्‍यूचे निदान झाले. याच वेळी चिकनगुनियाचा एक रुग्‍ण आढळला आहे. पावसाळ्‍यात साथीच्‍या रोगांना प्रतिबंध करण्‍यासाठी महापालिकेकडून उपाययोजना केल्‍या जात आहेत. सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्‍या पातळीवर डासोत्‍पत्ती ठिकाणांचे दैनंदिन सर्वेक्षण करून तेथे औषध फवारणी केली जात आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे साहाय्‍यक आरोग्‍य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.

महापालिका हद्दीत यंदा जानेवारी ते जून या कालावधीत डेंग्‍यूचे ४७२ संशयित रुग्‍ण आढळले होते. याच कालावधीत डेंग्‍यूचे निदान झालेले २१ रुग्‍ण आढळले होते आणि ते सर्व जानेवारी ते मार्च या कालावधीत सापडले होते.