News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

करोना उद्रेकामुळे गेल्या २०२० मध्ये पृथ्वीवासियांच्या वेगाला लगाम लागला होता. मात्र या वर्षात पृथ्वीचा स्वतः भोवती प्रदक्षिणा करण्याचा वेग वाढला होता असे निरीक्षण वैज्ञानिकांनी नोंदविले आहे. या वाढलेल्या वेगामुळे दिवस चोवीस तासापेक्षा कमी वेळात संपत आहे आणि परिणामी कालगणना योग्य प्रकारे होण्यासाठी निगेटिव्ह लीप सेकंड जोडावे लागेल अशी परिस्थिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार १९७० पासून आत्तापर्यंत असे लीप सेकंड २७ वेळा वाढविण्याची वेळ आली आहे. पृथ्वी जेव्हा एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी २४ तासापेक्षा जास्त वेळ घेते तेव्हा असे लीप सेकंड वाढविले जाते. मात्र २०२० मध्ये पृथ्वीने २४ तासापेक्षा कमी वेळात स्वतः भोवतीची प्रदक्षिणा पूर्ण केल्याने निगेटिव्ह लीप सेकंड जोडावे लागेल काय याची काळजी वैज्ञानिक करत आहेत

१९६० पासून अॅटॉमिक घड्याळ दिवसाच्या लांबीचे अचूक रेकॉर्ड देते आहे. त्या हिशोबाने ५० वर्षात पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग थोडा वाढून प्रथमच २४ तासापेक्षा कमी झाला आहे. २०२० मध्ये जुलै महिन्यात हा वेग २४ तासात १.४६०२ मिली सेकंदाने कमी झाला आहे. आता प्रतिदिनी सरासरी ०.५ सेकंदाने दिवस छोटा होत आहे. उपग्रह संपर्क उपकरणे, सोलर टाईम हिशोबाने काम करतात. हा वेळ तारे, चंद्र, सूर्य याच्या स्थितीवर अवलंबून असतो. यासाठीच जेव्हा पृथ्वीचा वेग कमी होत असे तेव्हा पॅरीसच्या इंटरनॅशनल अर्थ रोटेशन सर्व्हिस कडून पूर्वी लीप सेकंड जोडले जात होते.

अधिक माहिती व संदर्भ – माझा पेपर