नाशिक – येथील के. के. तंत्रनिकेतन मध्ये २०२३-२४ या वर्षात विविध नामांकित कंपनी मार्फत निवड झालेल्या १३० पेक्षा अधिक विदयार्थ्यांना त्यांच्या पालकांसह तंत्रनिकेतन मध्ये दिनांक २७/०४/२०२४ सोजी आमंत्रित करून संस्थेच्या वतीने मा. प्राचार्य प्रा. पी. टी. कडवे यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. प्रा. पी. टी. कडवे यांनी आपल्या भाषणातून डिप्लोमा नंतर कंपनी जॉईन करण्याचे महत्व, ६ लाखां पर्यंत चे वार्षिक पॅकेज तसेच नवीन शैक्षणिक धोरण (NEP) अन्वये आपला पाल्य जॉब बरोबर उच्च शिक्षणही घेऊ शकतो ह्या सरकारच्या निर्णया बाबत पालकांस अवगत केले.

प्राचार्य प्रा. पी. टी. कडवे यांचा हस्ते सत्कार


के. के. वाघ एज्युकेशन सोसायटी संचलित क. का. वाघ पॉलिटेक्निक मधे अंतीम वर्षाच्या १३०+ विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट झाले असून आजून बऱ्याच नामांकित कंपनीच्या मुलाखती चालू आहेत आहे अशी माहिती प्रा. पी. एम. मोहन यांनी दिली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थे चे अध्यक्ष समीर वाघ, प्राचार्य प्रकाश कडवे सचिव श्री. के. एस. बंदी, प्रा. एम. बी. झाडे अधिकारी, ट्रेनिंग अँण्ड प्लेसमेंट विभाग, सर्व विभाग प्रमुख, सौ. एस. एस. हिरे व विभागीय टी.पी.ओ. कोऑर्डिनेटर यांनी अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या उपक्रमा बाबत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी समाधान व्यक्त केले.