मागील तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कोरोनानं जगात थैमान घालायला सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात सर्वाधिक बाधित झालेला इटली देश आता पुन्हा एकदा कोरोनाच्या दृष्टचक्रात अडकला आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत रुग्णसंख्या शंभराच्या पलीकडेही जात नव्हती. पण, आता त्याच इटलीत गुरुवारी (29 ऑक्टोबर) एका दिवसात 26831आढळल्याने खळबळ माजली आहे

दुसरीकडे फ्रान्समध्येही कोरोनाने कहर घातल्याने आता पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता, पंतप्रधान अँजले मार्केल यांनी देशात 2 नोव्हेंबरपासून पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

केवळ फ्रान्स किंवा इटलीच नव्हे तर, अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रकोप सुरु असल्याचं दिसत आहे. अमेरिका देशात सर्वाधिक 91 लाख 75 हजार 336 कोरोनाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 59 लाख 54 हजार 907 रुग्ण बरे झाले आहेत. तर 2 लाख 33 हजार 731 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिका पाठोपाठ भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. भारतात आतापर्यंत 80 लाख 87 हजार 494 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 1 लाख 21 हजार 120 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यानंतर ब्राझील देशात 49 लाख 34 हजार 548 रुग्ण आढळले आहेत. तर रशियात आतापर्यंत 11 लाख 86 हजार 41 रुग्ण आढळले आहेत.

कोरोनाच्या जागतिक साथीच्या दुसऱ्या लाटेत केवळ जर्मनीच नाही तर युरोपातील स्पेन आणि फ्रान्स या दोन प्रमुख देशांनी निर्बंध लागू केले आहेत. स्पेनने सहा महिन्यांसाठी रात्रीची संचारबंदी यापूर्वीच लागू केली आहे. तर फ्रान्सने कडक लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे भारतानेही वेळीच धोका ओळखून काळजी घेण्याची गरज आहे.

संदर्भ – tv9Marathi