केंद्र सरकारने आयकर भरण्यासाठीचा कालावधी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवला आहे. यापूर्वी हा दिनांक ३० नोव्हेंबर हा होता. कोरोनामुळे घातलेल्या दळणवळण बंदीमुळे सरकारने १३ मे हा निश्चित केलेला दिनांक ३१ जुलैपर्यंत आणि नंतर तो ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवला होता. प्राप्तीकर अधिनियमानुसार ज्यांच्या खात्यांचे लेखापरिक्षण करणे आवश्यक आहे, अशा करदात्यांसाठी (त्यांच्या भागादारांसह) आयकर विवरणपत्र देण्याचा दिनांक ३१ ऑक्टोबरऐवजी ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढवण्यात आला आहे.