राष्ट्रीय राजधानी दिल्लीत वाढलेल्या करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ‘एम्स’ रुग्णालयाचे डॉ. गुलेरिया यांनी नागरिकांना सावधानता बाळगण्याचं आवाहन केलंय.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून करोना संक्रमित रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढलेली दिसून येतेय. मात्र, करोनाची तिसरी लाट सुरू झाल्याच्या चर्चांना एम्सचे संचालक डॉक्टर गुलेरिया यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावलंय. करोना संक्रमणाच्या प्रकरणांत वाढ झाल्याचं दिसून येत असेल तर यामागे लोकांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. एका वृत्तवाहिनीशी बोलताना डॉ. गुलेरिया यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. सोबतच त्यांनी नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्याचं आणि मास्कचा वापर करण्याचीही पुन्हा एकदा आवर्जुन आठवण करून दिलीय.


सौजन्य – महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी – इथे क्लिक करा