गुरुपौर्णिमा हा उत्सव दरवर्षी आषाढ पौर्णिमेला साजरा केला जातो. यावर्षी गुरुपौर्णिमा १० जुलै २०२५ रोजी असून हा दिवस गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस मानला जातो. गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप, जे आपल्या शिष्याला अज्ञानातून बाहेर काढून अध्यात्मिक मार्गावर चालायला शिकवतात.
या दिवशी शिष्य आपल्या गुरूंच्या चरणी कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
नाशिक जिल्ह्यातही गुरुपौर्णिमेनिमित्त विविध ठिकाणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीच्या वतीने संपूर्ण भारतात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरे करण्यात येत असून नाशिक शहर व जिल्ह्यातील ठिकाणे पुढीलप्रमाणे आहेत:
🌸 गुरुपौर्णिमा महोत्सव २०२५ कार्यक्रमाचे मुख्य भाग:
महर्षी व्यास व गुरूंची प्रतिमा पूजन
रामराज्य स्थापनेसाठी सामूहिक नामजप
लघुपट प्रदर्शन: “सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव”
स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके
व्याख्यान: राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी साधना व युद्धकाळातील आपले कर्तव्य
🛕 प्रमुख कार्यक्रम स्थळ व वेळा:
१. रामलीला लॉन्स व मंगल कार्यालय
स्थळ: जत्रा चौफुलीजवळ, आडगाव रोड, नाशिक
वेळ: संध्याकाळी ५.३० वाजता
२. सुदर्शन लॉन्स व मंगल कार्यालय
स्थळ: वडाळा पाथर्डी रोड, वनवैभव कॉलनी, इंदिरानगर, नाशिक
वेळ: संध्याकाळी ५.३० वाजता
संपर्क: ७३८७८२२१०४
३. श्री मुरलीधर मंदिर, येवला (जि. नाशिक)
स्थळ: टिळक मैदान, सोनी पैठणी जवळ
वेळ: संध्याकाळी ५.३० वाजता
संपर्क: ९७६६९६३३३१
४. श्री मारुती मंदिर, गाजरवाडी (ता. निफाड, जि. नाशिक)
वेळ: संध्याकाळी ५.३० वाजता
संपर्क: ९७६६९६३३३१
या गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंप्रती श्रद्धा व भक्ती व्यक्त करत नाशिकमध्ये होणाऱ्या या आध्यात्मिक महोत्सवात सहभागी व्हा!
