News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

मुंबई — महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर होणारे मद्यपान, असभ्य वर्तन, तोडफोड, प्लास्टिक कचरा टाकणे आणि अनधिकृत वास्तव्य यांसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी गड-किल्ले संवर्धन प्रतिष्ठानतर्फे ‘खडा पहारा’ मोहीम राबवली जाणार आहे.

ही मोहीम ३१ डिसेंबर २०२५ आणि १ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील २४३ ऐतिहासिक गड-दुर्गांवर एकाचवेळी राबवली जाणार आहे. या काळात दुर्गप्रेमी, स्वयंसेवक आणि प्रशासन मिळून किल्ल्यांवर पहारा देतील.

या मोहिमेला महाराष्ट्र शासन, स्थानिक ग्रामपंचायती, पोलीस प्रशासन, वनविभाग आणि राज्य पुरातत्व विभाग यांचे सहकार्य लाभणार आहे.

या उपक्रमात योगेश सोनवणे, अभिषेक नवले, नम्रता मोटे, शीतल श्रीखंडे, पालवी रसाळ, गार्गी पाटील, दीपेश वारंग, मानसी चव्हाण, वरद जोशी, महेश गुंजीकर, महेश चव्हाण, छाया सोनवणे, कुंडलिक झिने, नीलेश फटांगरे आणि मयूर भितळे यांचा सक्रिय सहभाग असेल.

पुणे, मुंबई, रायगड, नाशिक, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, जळगाव, सोलापूर, नागपूर, अमरावती, बुलढाणा, धुळे, नंदुरबार, अकोला आणि छत्रपती संभाजीनगर या विभागांतील गड-दुर्गांवर ही मोहीम राबवली जाणार आहे.