आमदार पात्रतेविषयीची सुनावणी येत्‍या आठवड्यात होईल ! – अध्‍यक्ष, विधानसभा

4

मुंबई – सर्वोच्‍च न्‍यायालयाने एका आठवड्यात पुढील सुनावणी घेण्‍याचे निर्देश दिले आहेत. त्‍यामुळे येत्‍या आठवड्यात आम्‍ही निश्‍चितपणे सुनावणी घेऊन निर्णय घेऊ, असे प्रतिपादन विधानसभेचे अध्‍यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले.

शिवसेनेच्‍या आमदारांच्‍या पात्र-अपात्रेविषयीच्‍या निर्णयाच्‍या पार्श्‍वभूमीवर राहुल नार्वेकर यांनी देशाचे महाधिवक्‍ता तुषार मेहता, तसेच अन्‍य कायदेतज्ञ यांची भेट घेतली. यानंतर प्रसिद्धीमाध्‍यमांच्‍या प्रतिनिधींशी बोलतांना त्‍यांनी वरील प्रतिक्रिया दिली.