News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

मुंबई, दि. 11 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन गुरूवार, दि. 11 मे 2023 रोजी सकाळी 9 ते दु 1 वाजेदरम्यान श्रीमती नाथिबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, पाटकर हॉल, चर्चगेट, मुंबई येथे करण्यात आले आहे. या शिबिरात इयत्ता 10 वी नंतर करियरच्या संधींबाबत तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. शिबिराचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे.

तरी जिल्ह्यातील इयत्ता 10 वी, 12 वी परीक्षेस प्रविष्ठ असलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन रविंद्र सुरवसे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.