संपूर्ण जगाचे लक्ष कोरोना प्रतिबंधक लसीकडे लागले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या शनिवारी कोरोनावरील लस तयार करणाऱया पुण्यातील ‘सिरम इन्स्टिटय़ूट’ला भेट देऊन लस निर्मितीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शनिवारी दुपारी चार वाजता लोहगाव विमानतळावर आगमन होईल. येथून हेलिकॉप्टरने ते सीरम इन्स्टिटय़ूटमध्ये जाणार आहेत. सीरम इन्स्टिटय़ूटमध्ये निर्मिती केली जाणारी कोरोना प्रतिबंधक लस संशोधनाच्या तिसऱया टप्प्यात असून, या लसीचे परिणाम सकारात्मक येत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिरम इन्स्टिटय़ूटमधील भेटीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.