नवी दिल्ली : राज्यांना आता केंद्राच्या संमतीविना लॉकडाऊन लावता येणार नाही. कंटेनमेन्ट झोनमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करता येईल, असे केंद्रीय गृह विभागाने कोरोना प्रतिबंधासाठी जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. त्यांची अंमलबजावणी १ ते ३१ डिसेंबरपर्यंत केली जाणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटलेले आहे. देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक बैठक मंगळवारी आयोजिण्यात आली होती.
डायनॅमिक कंटेनमेन्ट झोन स्थापन करण्याची गरज असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या बैठकीत सांगितले होते.