१. ‘या काळात निराभिमानता असणा‍र्‍या दैवी प्रकृतीच्या जिवांचा संचार होतो.

२. हा काळ सत्त्वगुणप्रधान असतो. सत्त्वगुण ज्ञानाची अभिवृद्धी करणारा आहे. या काळात बुद्धी निर्मळ आणि प्रकाशमान असते. ‘धर्म’ आणि ‘अर्थ’ यांविषयी करावयाची कामे, वेदांत सांगितलेली तत्त्वे (वेदतत्त्वार्थ) यांचे चिंतन, तसेच आत्मचिंतन यांसाठी ब्राह्ममुहूर्त हा उत्कृष्ट काळ आहे.

३. या काळात सत्त्वशुद्धी, कर्मरतता, ज्ञानग्रहणता, दान, इंद्रियसंयम, तप, शांती, भूतदया, निर्लोभता, निंद्यकर्म करण्याची लज्जा, स्थैर्य, तेज आणि शौच (शुद्धता) हे गुण अंगी येण्याचे कार्य सुलभ होते.

४. या काळात डास, ढेकूण आणि पिसवा क्षीण होतात.

५. या काळात वाईट शक्तींचे प्राबल्य क्षीण होते.’

-गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

संदर्भ – दैनिक सनातन प्रभात