News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

दिवाळीत लोकांनी स्थानिक उत्पादनेच वापरून ‘व्होकल फॉर लोकल’ या तत्त्वाचा अवलंब करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी स्थानिक उत्पादने वापरणे गरजेचे आहे,असे आवाहन करताना त्यांनी सांगितले,की ‘व्होकल फॉर  लोकल’ हा मूलमंत्र आचरणात आणण्यासाठी स्थानिक उत्पादनेच खरेदी करावीत. परदेशी उत्पादने खरेदी करू नयेत, वाराणसीतील लोकांनीही खरेदी करताना स्थानिक उत्पादनेच खरेदी करावी.

वाराणसी येथील  ७०० कोटींच्या १९ विकास  प्रकल्पांचे उद्घाटन त्यांनी केले. मोदी यांनी सांगितले की,  दिवाळीच्या निमित्ताने लोकांनी स्थानिक  उत्पादनांना संधी द्यावी, कारण या काळात मोठय़ा प्रमाणात खरेदी-विक्री होत असते.

तुम्ही स्थानिक उत्पादने खरेदी करून त्याचा अभिमान बाळगा. त्यामुळे स्थानिक व देशी उत्पादनांचा दर्जा चांगला असल्याचा संदेश इतरांनाही जाईल. यात स्थानिक ओळख तर निर्माण होईलच, त्याशिवाय सगळ्यांची दिवाळीही प्रकाशमान होईल.