News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

गांधीनगर (गुजरात) – तालिबान्यांनी अफगाणिस्तानावर नियंत्रण मिळवल्यानंतर  काबुलमध्ये असणार्‍या भारतीय दूतावासात काम करणारे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक यांना सुरक्षितरित्या भारतात आणण्यात आले. भारतीय वायूदलाच्या ‘सी-१७ ग्लोबमास्टर’ या विमानातून या सर्वांना आणण्यात आले. यात राजदूतांसमवेत १२० जणांचा समावेश आहे.

यापूर्वी १६ ऑगस्ट या दिवशी १५० भारतियांना परत आणण्यात आले होते. आणखीही काही भारतीय अफगाणिस्तानात अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी अजून एक विमान काबुलला पाठवण्यात येणार आहे.