News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजपच्या युतीत सामील झाले आहे. अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राजभवन येथे हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल रमेश बैस हेदेखील उपस्थित होते.

सध्या राजभवनावर शपथविधी सोहळा सुरू आहे. राज्याला सध्या दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत. दरम्यान राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

एकाच टर्म मध्ये अजित पवार तीनदा उपमुख्यमंत्री झाले आहेत.