करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीचा किरणोत्सव !

57

कोल्हापूर – प्रत्येक वर्षी जानेवारी-फेब्रुवारी आणि नोव्हेंबर मध्ये सूर्यास्ताच्या वेळी श्री महालक्ष्मीदेवीच्या संदर्भात एक विलक्षण घटना अनुभवण्यास येते, ती म्हणजे किरणोत्सव होय ! यंदा ९ ते ११ नोव्हेंबर या तीन दिवसांत हा किरणोत्सव होत आहे. यात पहिल्या दिवशी सूर्याची किरणे थेट श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या पायांवर पडतात, दुसर्‍या दिवशी सूर्याची किरणे देवीच्या छातीपर्यंत पोचतात, तर तिसर्‍या दिवशी सूर्याची किरण देवीच्या पूर्ण अंगावर पडतात. दळणवळण बंदीच्या पार्श्‍वभूमीवर मंदिर अद्याप बंद असल्याने कोणत्याही भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही; मात्र किरणोत्सवाचा प्रतिवर्षीप्रमाणे अभ्यास केला जाणार आहे.

गेली अनेक वर्षे किरणोत्सवाच्या मार्गात अतिक्रमणामुळे अडथळे निर्माण होत होते. यात महाद्वारासमोरील उंच इमारतींचा समावेश होता; मात्र हे अतिक्रमण काढण्यात आल्याने सध्या पूर्ण क्षमतेने किरणोत्सव होत आहे. यंदा ३० जानेवारी, ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी हे तीन दिवस पूर्ण क्षमतेने किरणोत्सव झाला. हा उत्सव प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि भाविकांसाठी ती एक पर्वणीच असते. यंदा मंदिर बंद असले, तरी पश्‍चिम महाराष्ट्र्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून किरणोत्सव सोहळ्याचे ‘लाईव्ह ब्रॉडकास्टींग’ www.mahalaxmikolhapur.com या संकेतस्थळाद्वारे आणि https://t.ly/V6hR या भ्रमणभाष ‘अ‍ॅप’द्वारे केले जाणार आहे.