News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

न्यायमूर्ती एम.आर. शाहांच्या निवृत्तीआधीच निकाल लागू शकतो. न्यायमुर्ती 15 मे 2023 रोजी निवृत्त होत आहे. त्यामुळे त्याधीच महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल लागण्याची चिन्हे आहेत.

ठाकरे गटाची याचिका आहे की, एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांना अपात्र करा. तर शिंदेंच्या शिवसेनेची याचिका आहे की, ठाकरे गटाचे 14 आमदार अपात्र करा. त्यामूळे घटनापीठ प्रकरण कोणाकडे सोपवणार? सध्याचे राहुल नार्वेकर की तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ? कारण घटनातज्ज्ञांच्या मते, आमदारांना थेट अपात्र करण्याचा अधिकार, सुप्रीम कोर्टाला नाही.

निकाल काहीही लागला तरी सध्याचे सरकार बहुमत गमवणार नाही. एकनाथ शिंदे अपात्र झाले तर सरकार कोसळेल मात्र पुन्हा नव्याने सरकार स्थापन होऊ शकते फक्त मुख्यमंत्री कोण होईल हे बघणे महत्वाचे ठरेल. त्यात मा. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन हे म्हंटले आहे.

सत्तासंघर्षाला 10 महिने झालेत. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाचा निकाल काय असेल, याकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष देऊन आहे. निकालाची आतुरता आठवड्याभरातच संपेल असं सध्या तरी दिसत आहे