नाशिक (Nashik) येथील जिल्हा उपनिबंधकांना ३० लाख रुपयांची लाच घेतांना अटक !

11

नाशिक – Nashik जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत तक्रारदार हे संचालकपदी कायदेशीर आणि वैधपणे निवडून आले आहेत. तरीही त्यांच्या निवडीच्या विरोधात प्रविष्ट झालेल्या प्रकरणात सुनावणी घेऊन संचालक म्हणजे तक्रारदाराच्या बाजूने निर्णय देण्यासाठी ३० लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी येथील जिल्हा उपनिबंधक सतीश खरे (वय ४० वर्षे) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक पथकाने त्यांच्या रहात्या घरातून रंगेहात पकडून अटक केली.

advertisement

खरे यांच्यासमवेत त्यांचे साथीदार अधिवक्ता शैलेश सभद्रा (वय ३२ वर्षे) यांनाही पथकाने अटक केली आहे.