मुंबई – कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा ४ ऑक्टोबरपासून चालू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनुमती दिली आहे. शालेय शिक्षण विभागाकडून शाळा चालू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे अनुमती मागण्यात आली होती. ही मागणी मुख्यमंत्र्यांनी आता मान्य केली आहे. राज्यशासनाने नियुक्त केलेल्या तज्ञ डॉक्टरांच्या ‘चाइल्ड टास्क फोर्स’कडूनही कोरोना नियंत्रित राहिल्यास दिवाळीनंतर शाळा चालू करण्यास सहमती दर्शवली होती. पालक आणि विद्यार्थी वर्ग यांच्याकडूनही अनेक दिवसांपासून शाळा चालू करण्याची मागणी करण्यात येत होती. यापूर्वी शिक्षण विभागाकडून शाळा चालू करण्याचा दिनांक घोषित करण्यात आला होता; मात्र कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या शक्यतेने शाळा चालू करण्याचा निर्णय रहित करण्यात आला. आता पुन्हा शाळा चालू करण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाकडून कोरोनाविषयीच्या दृष्टीने आवश्यक ती सिद्धता चालू करण्यात आली आहे.
ठळक बातम्या
रविवारी, महाराष्ट्राच्या उत्तर भागात गारपिटीचा इशारा
महाराष्ट्राच्या काही भागात पावसासह जोरदार वारे, गडगडाट आणि विजांचा कडकडाट होईल, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होऊ शकते असाही त्यांचा अंदाज आहे.
हवामानाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी म्हणतात की भारताच्या काही भागात मोठे वादळ येणार आहे. हे 26 नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि देशाच्या वायव्य आणि पश्चिमेकडील ठिकाणांवर परिणाम करेल. वादळ होईल कारण पश्चिमेकडून येणारे थंड वारे दक्षिणेकडील उष्ण वाऱ्यांसोबत मिसळतील.
यामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आकाशातून गारा पडतील. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर अशा काही शहरांमध्ये रविवारी गारपीट होईल. त्याचवेळी अरबी समुद्रात आणखी एक वादळ निर्माण होत आहे. या वादळामुळे हवामान ढगाळ होत असून हवा ओली होत आहे. शुक्रवारी काही ठिकाणी ढगाळ आणि थंडी होती, मात्र दुपारी उष्णतेने ढग निघून गेले. संध्याकाळी ढग परत आले. विदर्भात तापमानात कमालीची घसरण झाली आहे.
आणखी वाचा
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व प्रार्थनास्थळे उघडणार, शासनाचा निर्णय
मुंबई: राज्यातील धार्मिक स्थळांचे दरवाजे अखेर खुले होणार आहेत. पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
'दिवाळीचे मंगल पर्व सुरू...