Maharashtra SSC Result 2025 online check details for 10th students
Maharashtra SSC Result 2025 online check details for 10th students

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) २०२५ चा इयत्ता १० वीचा निकाल उद्या 13 मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करणार आहे. विद्यार्थ्यांना mahresult.nic.in, sscresult.mkcl.org आणि msbshse.co.in या अधिकृत संकेतस्थळांवरून त्यांचे गुण तपासता येतील.

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या सीट नंबरची आवश्यकता असेल.  निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका डाउनलोड करता येतील.

महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळांवरून निकाल पाहण्यासाठी खालील पद्धत वापरता येईल:

1. mahresult.nic.in किंवा sscresult.mkcl.org या संकेतस्थळांपैकी एक उघडा.


2. “SSC Examination Result 2025” या लिंकवर क्लिक करा.


3. आपला सीट नंबर आणि इतर आवश्यक माहिती प्रविष्ट करा.


4. “Submit” बटणावर क्लिक करा.


5. आपला निकाल स्क्रीनवर दिसेल; तो डाउनलोड करा किंवा प्रिंट घ्या.



विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळांवरूनच निकाल पाहावा आणि अफवांपासून सावध राहावे.