News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

पोखरण (राजस्थान) – संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (‘डी.आर्.डी.ओ.’ने) २२ ऑक्टोबरला सकाळी पावणे सात वाजता येथील सैन्यतळावर ‘नाग’ या रणागडाविरोधी क्षेपणास्त्राची घेतलेली अंतिम चाचणी यशस्वी ठरली आहे.  या क्षेपणास्त्राद्वारे १० किलोमीटर अंतरावरील रणगाडा उडवता येऊ शकतो. भविष्यात लढाऊ हेलिकॉप्टरवर हे क्षेपणास्त्र बसवण्यात येईल. या यशस्वी चाचणीमुळे भारताला आता इस्रायल आणि अमेरिका यांच्याकडून अशा क्षमतेची क्षेपणास्त्रे आयात करण्याची आवश्यकता उरणार नाही.