News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

गोपालपूर (ओडिशा) — भारताने संरक्षण क्षेत्रात आणखी एक मोठे पाऊल उचलत ड्रोनविरोधी ‘भार्गवास्त्र’ रॉकेटची यशस्वी चाचणी पार पाडली आहे. ओडिशाच्या गोपालपूर येथे पार पडलेल्या या चाचणीत भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ३ वेळा चाचणी घेण्यात आली. यामध्ये एकूण ४ रॉकेट्स डागण्यात आले आणि ती सर्व लक्ष्यावर अचूकपणे आदळली.

ही रॉकेट प्रणाली ‘सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड’ या भारतीय संस्थेद्वारे विकसित करण्यात आली असून, ती विशेषतः ड्रोन हल्ल्यांना प्रतिबंध घालण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

भार्गवास्त्रची ही चाचणी यशस्वी ठरल्यामुळे भारताच्या संरक्षण क्षमतेत महत्त्वाची भर पडली आहे. भविष्यातील हवाई सुरक्षेसाठी हा एक मोठा टप्पा मानला जात आहे. लष्करी सूत्रांनुसार, ही प्रणाली विविध प्रकारच्या ड्रोन आक्रमणांना त्वरित प्रतिसाद देण्यास सक्षम आहे.