अभिनेते सैफ अली खान यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘अॅमेझॉन प्राईम’ या ‘ओटीटी’ अॅपवरून प्रदर्शित झालेल्या ‘तांडव’ या वेब सिरीजमधून भगवान शिव आणि श्रीराम यांचा अवमान करण्यात आल्याने तिच्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे भाजपचे नेते कपिल मिश्रा, नरेंद्रकुमार चावला, गौरव गोयल, खासदार योगी बालकनाथ, मुंबईतील खासदार मनोज कोटक यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी केली आहे. तसेच सामाजिक माध्यमांतून ‘#BanTandavNow’ आणि ‘#BoycottBollywood’ हे हॅशटॅगही ट्रेेंड करण्यात आले आहेत. यावर १ लाख ६५ सहस्र लोकांनी ट्वीट्स करून या वेब सिरीजचा विरोध केला. हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफर यांच्याद्वारे निर्मित ‘तांडव’ ही वेब सिरीज ९ भागांची आहे. त्यात सैफ अली खान यांच्यासमवेत महंमद झिशान, अभिनेत्री डिंपल कपाडिया, अभिनेते सुनील ग्रोव्हर हे कलाकार आहेत.
तांडव’ वेब सिरीजवर बहिष्कार घाला ! – राम कदम, आमदार, भाजप
भाजपचे आमदार राम कदम यांनी जोपर्यंत या वेब सिरीजमध्ये योग्य ते पालट करण्यात येत नाहीत, तोपर्यंत ‘तांडव’ वेब सिरीजवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. आमदार राम कदम यांनी सामाजिक माध्यमांत ट्वीट करतांना म्हटले आहे की, चित्रपट किंवा वेब सिरीज यांच्या माध्यमातून कायम हिंदूंच्या देवतांचा अवमान का केला जातो ? अलीकडचे उदाहरण घ्यायचे झाले, तर नवीन वेब सिरीज ‘तांडव’ हे आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार्या वेब सिरीजचे सैफ अली खान पुन्हा एकदा भाग बनले आहेत. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी वेब सिरीजमधून ते दृश्य हटवले पाहिजे. अभिनेता झिशान अय्यूब याने जाहीरपणे क्षमा मागावी.
आखिरकार क्यों हर बार फिल्मों और वेब सीरीज में हिन्दू देवी देवताओं को अपमानित करने का काम किया जाता है। ताजा उदाहरण नई वेब सीरीज ‘तांडव’ है। सैफ अली खान एक बार फिर ऐसी फिल्म या सिरीज़ का हिस्सा है जो हिन्दू भावनाओं
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) January 17, 2021
को ठेस पहुचाता है। डायरेक्टर अली अब्बास जफर को सिरीज़ से भगवान pic.twitter.com/z35cHoiw9d