पणजी, २८ जून (वार्ता.) – गोव्यात प्रारंभीपासूनच समान नागरी कायदा लागू आहे. गोव्यात समान नागरी कायदा चालतो, तर मग देशात का नाही ? नवीन भारत निर्माण करण्यासाठी देशात समान नागरी कायदा लागू केला पाहिजे, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. देशभरात समान नागरी कायदा लागू करण्यासंबंधी सध्या चर्चा चालू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘देशभरात हा कायदा लागू करणे कितपत शक्य आहे ?’, याविषयी ‘टाईम्स नाऊ’ या राष्ट्रीय वृत्तवाहिनीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मत जाणून घेतले. या वेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी वरील अभिप्राय दिला.

समान नागरी कायदा लागू करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य आहे. संपूर्ण देशात हा कायदा लागू झाला पाहिजे. जात आणि धर्म यांच्या आधारे विभाजन होता कामा नये. विवाह नोंदणी, मालमत्तेचा अधिकार, जन्मनोंदणी आदींसाठी एकच कायदा असला पाहिजे. गोव्यात एवढी वर्षे हा कायदा लागू असतांनाही गोव्यातील सर्व धर्मांच्या लोकांना काहीच अडचण निर्माण झालेली नाही, तर संपूर्ण देशात हा कायदा लागू करण्यास अडचण का यावी ?’’

सौजन्य : MIRROR NOW