struggle
Photo by Marek Piwnicki on Pexels.com

नाशिक – नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या भंडारदरा धरणाच्या परिसरातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात काजवा महोत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे. यासाठी वनविभागही सज्ज झाले असून यावर्षी पर्यटकांनी हा परिसर हाउसफुल होणार आहे. या महोत्सवाची अॅडव्हान्स बुकिंगही सुरु झाली आहे. 

सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असणाऱ्या कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात पावसाळ्याच्या अगोदर काजव्यांची चमचम सुरू होत असते. ही काजव्यांची चमचम तालुक्यातील म्हणजे पावसाची चाहूल असते. हिरडा, बेहडा, सादडा यासारख्या झाडांवर स्वयंप्रकाशित काजवा कीटक कोट्यवधींच्या संख्येने एकाच वेळेस लयबद्ध पद्धतीने चमकत असतात. काजवा महोत्सवासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, पर्यटकांना काजव्यांचा व्यवस्थित आनंद घेता यावा म्हणून वनविभागाकडून जोरदार तयारी सुरू आहे.