जगातल्या सर्वात सुंदर पर्यटन स्थळांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश

8

कोंड नेस्ट ट्रॅव्हलर’या मासिकानं तयार केलेल्या जगातल्या सर्वात सुंदर पर्यटन स्थळांमध्ये महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले स्वच्छ सुंदर समुद्र किनारे, समुद्रातलं प्रवाळ, सिंधुदुर्ग किल्ला, त्सुनामी आयलंड या सारख्या पर्यटनस्थळांविषयी यात माहिती देण्यात आली आहे.

लंडन, सिंगापूर,इस्तंबूल इथल्या जागतिक पर्यटन स्थळांसह भारतातल्या सिक्कीम, मेघालय, ओरिसा, राजस्थान, गोवा, कोलकाता आणि केरळ या राज्यांमधल्या पर्यटन स्थळांचा देखील या यादीत समावेश आहे. चिपी विमानतळ सुरू झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा जागतिक पर्यटनाच्या नकाशावर पोहोचला असून जगातल्या सर्वात सुंदर ३० पर्यटन स्थळांच्या यादीत समावेश होणं ही गोष्ट अभिमानास्पद असल्याचं सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी म्हटलं आहे.