संपूर्ण देशात लवकरच ‘वन नेशन, वन गोल्ड’ ही व्यवस्था लागू होण्याची शक्यता

74

संपूर्ण देशात लवकरच ‘वन नेशन, वन गोल्ड’ ही व्यवस्था लागू होण्याची शक्यता आहे. या व्यवस्थेनुसार, देशातील कोणत्याही राज्यात सोन्याचा एकसारखाच भाव असेल. देशभरात ही व्यवस्था आणण्याचा विचार सरकारकडून सुरु आहे.

भारतात बहुतकरुन सोनं आयात केलं जातं आणि त्याची किंमत एकच असते. मात्र, वेगवेगळ्या राज्यांमध्ये ते वेगवेगळ्या किंमतीत विकलं जातं. खरतरं विविध भागांमध्ये सोन्याच्या किंमती ज्वेलर्स असोसिएशन निश्चित करत असतात. त्यामुळे सोन्याचे भाव काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त असतात.

दरम्यान, ज्वेलर्स असोसिएशनची मागणी आहे की, सरकारने देशात ‘वन नेशन, वन गोल्ड’ ही व्यवस्था आणावी. यामुळे ग्राहकाला देशभरात सर्व ठिकाणी एकाच किंमतीत सोनं उपलब्ध होईल. मात्र, यावर सरकार काय निर्णय घेते हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. एकच किंमत सर्व जागी लागू झाली तर याचा ग्राहकांना मोठा फायदा होईल. ते कुठल्याही राज्यातून सोन खरेदी करु शकतात.