Cyclone Biparjoy – 48 तासांत गुजरातला बिपरजॉय चक्रीवादळ धडकणार

10

बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी मांडवी आणि कराची येथे धडकण्याची शक्यता आहे. गुजरात किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील किनारी भागातून 7500 लोकांना सुरक्षीत स्थळी हलवण्यात आलं आहे. त्याचबरोबर तीन्ही सैन्यदल अलर्ट मोडवर आहेत. तर पश्चिम रेल्वेकडून गुजरातच्या किनारपट्टी भागात जाणाऱ्या 67 गाड्या रद्द केल्या आहेत. दुसरीकडे मुंबईसह महाराष्ट्रातल्या समुद्र किनाऱ्यावरील गावांना देखील हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात देण्यात आला आहे.