News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

भिवंडी – शहरातील भंडारी कंपाऊंड येथे असलेल्‍या ‘सनलाईट’ या खासगी रुग्‍णालयात ‘आधुनिक वैद्यांच्‍या हलगर्जीपणामुळे आणि इंजेक्‍शनचे ३ डोस लागोपाठ दिल्‍यामुळे मुलीचा मृत्‍यू झाला आहे’, असा आरोप करून मुलीच्‍या नातेवाइकांनी रुग्‍णालयाची तोडफोड केली, तसेच आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांना मारहाण केली.

भिवंडी रुग्णालयात मुलीचा मृत्यू



नितीन कांबळे यांची मुलगी श्रद्धा हिला उलट्या होत असल्‍याने उपचारासाठी सनलाईट रुग्‍णालयात १३ जून या दिवशी भरती केले. तिला सलाईनमधून इंजेक्‍शन देण्‍यात आले. त्‍यानंतर श्रद्धा बेशुद्ध पडून निपचित झाली. आधुनिक वैद्यांनी तिला मृत घोषित केले.

वरील घटनेची माहिती मिळताच स्‍थानिक भोईवाडा पोलीस घटनास्‍थळी आले. पोलिसांनी नातेवाइकांची समजूत काढून परिस्‍थिती आटोक्‍यात आणली. ‘आधुनिक वैद्यांवर कायदेशीर कारवाई करावी’, अशी मागणी मुलीच्‍या कुटुंबियांनी केली आहे.