News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

दक्षिण अरबी समुद्रात मान्सूनचे आगमन झाले असून काही राज्यांत मुसळधार पावसाच्या सरी बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. येत्या काही दिवसांत केरळमध्येही हे नैऋत्य मोसमी वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे आता लवकरच पावसाचा आनंद घेता येईल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्या मौसमी वाऱ्यांनी आज दक्षिण अरबी समुद्र आणि मालदीवचा काही भाग, कोमोरिन क्षेत्र, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान व निकोबार बेट तसेच अंदमान समुद्राचा भाग व्यापला आहे. नैऋत्याला लागून असलेल्या पश्चिम बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.

२४ मे पर्यंत ते बंगाल उपसागराच्या मध्यवर्ती भागांवर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार करतील, असे हवामान विभागाने म्हटले आहे. ‘या’ भागात रेड अलर्ट या आठवड्यात दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. केरळला रेड अलर्ट जारी केला असून, २५ मेपर्यंत मुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे.