NDA Meeting Updates
NDA Meeting Updates

नवी दिल्ली: देशातील 18व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर झाला. भाजपने यावेळी 400 पेक्षा जास्त जागांचा दावा केला होता, परंतु बहुमताचा आकडा गाठण्यात अपयशी ठरला. तरीही, एनडीए आघाडीने 294 जागांवर विजय मिळवून तिसऱ्यांदा बहुमत मिळवले. यामुळे राजधानी दिल्लीत आज एनडीए आघाडीची बैठक झाली. या बैठकीत एनडीएतील सर्व घटक पक्षांनी आपली भूमिका मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा एनडीएच्या नेतेपदी निवड झाली आहे, ज्यामुळे ते पंतप्रधानपदाची हॅटट्रिक करणार आहेत. भाषणादरम्यान मोदींनी पुढील 10 वर्षांचे लक्ष्य ठेवून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच निवडणूक निकालांवर भाष्य करताना इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आणि ईव्हीएम मशीनवर टीका करणाऱ्या विरोधकांवर निशाणा साधला.

विरोधकांनी मागील लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांनंतर ईव्हीएम मशिन्सवर संशय व्यक्त केला होता. भाजपच्या विजयानंतर, पराभूत नेत्यांनी ईव्हीएममध्ये घोटाळा असल्याचे सांगून बॅलेट पेपरने मतदान घेण्याची मागणी केली होती. परंतु, यंदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीला चांगले यश मिळाले, त्यामुळे ईव्हीएमवर कोणतेही संशयाचे विधान झाले नाही. नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात या मुद्द्यावर जोर दिला.

मोदींनी विरोधकांना गप्प केले 4 जून रोजी निकाल लागल्यानंतर मोदींनी त्यांच्या सहकाऱ्याला विचारले की, देशात ईव्हीएम जिवंत आहे का. त्यांनी म्हटले की विरोधक ईव्हीएम मशीनवर टीका करायचे, परंतु निकालानंतर ईव्हीएमने विरोधकांना गप्प केले. मोदींनी यावरून विरोधकांवर टीका केली की, विरोधकांनी भारताच्या लोकशाही प्रक्रियेवर विश्वास उडवण्यासाठी प्रयत्न केले होते.

भारताची बदनामी करण्याचा कट 2029 साली विरोधक पुन्हा एकदा ईव्हीएम मशिनवर टीका करतील. निवडणुकीच्या काळात विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या कामात अडथळा आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मोदींनी म्हटले की विरोधकांनी निवडणूक आयोगावर आरोप करून भारताची जगात बदनामी करण्याचा कट रचला होता. मोदींनी NDA घटक पक्षांचे आभार मानत म्हटले की, NDA हे सरकार मिळवण्यासाठी जमलेली टोळी नसून देशसेवेसाठी कटिबद्ध असलेला समूह आहे.

एनडीएची शक्ती एनडीएला देशातील 22 राज्यांत सरकार बनवून जनतेने सेवा करण्याची संधी दिली आहे. मोदींनी सांगितले की, 10 राज्यांपैकी 7 राज्यांत एनडीए सेवा करत आहे. एनडीए ही देशाच्या राजकारणातील ऑर्गॅनिक अलायन्स आहे. एनडीएच्या नेतेपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल मोदींनी सर्वांचे आभार मानले आणि देशसेवेचे वचन दिले.

एनडीएचे यश मोदींनी म्हटले की एनडीए आघाडीने प्री-पोल अलायन्समध्ये अभूतपूर्व यश मिळवले आहे. तीन दशकं पूर्ण झालेल्या एनडीएने पाच पाच वर्षांचे तीन टर्म पूर्ण केले आहेत आणि आता चौथ्या टप्प्यात प्रवेश करत आहे. मोदींनी सांगितले की, भारतातील प्रत्येक क्षेत्राच्या रिजनल आणि नॅशनल ध्येयांना एकत्रित ठेवून काम करण्याची गरज आहे. असे मोदींनी भाषणात म्हटले