कीव (युक्रेन) – रशियाशी चर्चेसाठी सिद्ध आहे; परंतु बेलारूसमध्ये नाही, असे युक्रेनचे राष्ट्रध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी म्हटले आहे. रशियाने बेलारूसच्या बेलारशियन प्रदेशातून युक्रेनवर आक्रमण केले नसते, तर त्यांच्या मिन्स्क शहरामध्ये चर्चा होऊ शकली असती, असे झेलेंस्की म्हणाले. रशियाने युक्रेनला बेलारूसमध्ये चर्चेसाठी आमंत्रित केले होते; मात्र युक्रेनने रशियाची अट नाकारत चर्चा करण्यास नकार दिला आहे. झेलेंस्की यांनी सांगितले की, आम्ही वॉर्सा (पोलंड), ब्रातिस्लाव्हा (स्लोव्हाकिया), बुडापोस्ट (हंगेरी), इस्तंबूल (तुर्कस्तान) आणि बाकू (अझरबैजान) यांपैकी कोणत्याही ठिकाणी चर्चेस सिद्ध आहोत.
Home International News रशियाशी चर्चेला सिद्ध परंतु बेलारूस येथे नाही ! – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की