मुंबई – जेव्हा तुम्ही एक चांगला चित्रपट बनवता, तेव्हा तो चित्रपट संपूर्ण कुटुंबासमवेत पाहिला जातो. महिलांचे शरीर पुष्कळ किमती आहे. त्यामुळे त्यांचे शरीर जितके झाकलेले असेल, तितके योग्यच आहे. सध्या मुले ज्याप्रमाणे मुलींकडे पहातात, ते आपल्या बहिणी, पत्नी आणि आई यांसाठी योग्य नाही, असे विधान अभिनेते सलमान खान यांनी एका मुलाखतीत केले. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी ‘महिलांनी सेटवर ‘नेकलाईन’ (खोल गळ्याचा) ड्रेस घालू नये’, असा सलमान खान यांचा नियम होता’, असे अभिनेत्री पलक तिवारी यांनी सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर सलमान खान बोलत होते.
‘ओटीटी’वर दाखवण्यात येणार्या दृश्यांविषयी ते म्हणाले, ‘ओटीटीवर (‘ओव्हर द टॉप’वर) सेन्सॉरशिप (निर्बंध) असायला हवी. अश्लीलता, नग्नता, तसेच शिवीगाळ हे सर्व बंद झाले पाहिजे. आता सर्वकाही भ्रमणभाषवर उपलब्ध झाले आहे. १५ किंवा १६ वर्षीय मुलाने ते पाहिले, तर आपण समजू शकतो; पण तुमच्या अभ्यास करणार्या छोट्या मुलीने हे सर्व पाहिले, तर कसे वाटेल ? त्यामुळे ‘ओटीटी’वर कंटेट (आशय) जितका स्वच्छ असले, तितके चांगले.’’
सलमान खान हे सामान्य जनतेतल्या मनातील बोलले आहेत. ही अश्लीलता बंद करण्यासाठी सलमान खान यांच्यासारख्या वलयांकित अभिनेत्यांनी पुढाकार घ्यावा !