नाशिक – मान्सून जवळ येत असताना, गुरुवार (दि. ७ ) रोजी पूर्वमोसमी पावसाने जिल्ह्यात विविध भागांमध्ये आपली उपस्थिती दाखवली. सकाळपासूनच जिल्ह्यात प्रचंड उकाडा जाणवत होता, ज्यामुळे नागरिक अक्षरश: घामाघूम झाले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पावसाने नाशिक शहरातील विविध भागांत हजेरी लावली, ज्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.
दुपारपर्यंत नाशिकसह जिल्ह्यातील विविध भागांत कडक ऊन होते. त्यानंतर ऊन कमी होऊन सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झाले. नंतर नाशिक शहरातील विविध परिसरांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली.