महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावी परीक्षांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यभरातील जवळपास २१ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवणारे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बारावीचा निकाल (HSC Result 2025) मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल (SSC Result 2025) दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिक्षण मंडळ लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. संभाव्य तारखेनुसार, १५ मे २०२५ पर्यंत दोन्ही निकाल जाहीर होतील.
निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थी आपले गुण खालील अधिकृत संकेतस्थळांवर पाहू शकतील:
- mahresult.nic.in
- mahahsscboard.in
- hscresult.mkcl.org
- msbshse.co.in
- mh-ssc.ac.in
- sscboardpune.in
- sscresult.mkcl.org
- hsc.mahresults.org.in
विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अधिकृत घोषणेसाठी शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.