जोपर्यंत चित्रपटाचे नाव पालटत नाही, तोपर्यंत चित्रपटाला प्रमाणपत्र देऊ नये !

81

मुंबई, २१ ऑक्टोबर (वार्ता.) – श्रीलक्ष्मीदेवीचा अवमान करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाचे नाव पालटावे. जोपर्यंत चित्रपटाचे नाव पालटण्यात येत नाही, तोपर्यंत या चित्रपटाला प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडे (‘सेन्सॉर बोर्डा’कडे) करण्यात आली आहे. याविषयी समितीचे प्रवक्ते वैद्य उदय धुरी यांनी १७ ऑक्टोबर या दिवशी केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळांच्या अध्यक्षांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवले आहे; मात्र अद्याप मंडळाकडून पत्राला उत्तर देण्यात आलेले नाही.

Source – sanatan prabhat